चायला लहानपण एक नंबर असतं ...
जेव्हा सारकाही माफ़ असतं
जेव्हा सार जग आपल्याच मागे असतं
आपण हट्ट करायचा असतो
अणि त्यांनी तो पुर्वाय्चा असतो
गोष्टी ऐकत आईच्या कुशीत झोपायच असतं
उठताना पाच मिंट म्हणता म्हणता
चांगलं एक तास झोपायच असतं
चायला लहानपण एक नंबर असतं ...
मधल्या सुट्टीत दुसर्याच्या डब्यात्ल खायच असतं
अन उरलेला डबा परत आणल्यावर
आईचा ओरडा खाताना मनं ही तित्कच निरागस असतं
मोठेपणी हे नाही ते व्हायचय
असं एक स्वप्न असतं
कारण त्यावेळी सारकाही माफ़ असतं
ते स्वप्न आता जगताना सगळच बदललेल असतं
कारण आता सारकाही माफ़ नसतं
सारं जग तुम्हालाच हसत असतं
आता वाटतं जगावं परत तेव्हा सारखं
नुकतेच पंख फुटलेल्या पाखरा सारखं
चायला लहानपण एक नंबर असतं..
chhan!aawadli.keep it up.-rishi
ReplyDelete